जालना – जालना विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुनराव पंडितराव खोतकर यांचा विकासरथ आणि विजय कोणीच रोखू शकत नाही असा दुर्दम्य विश्वास बूथ प्रमुख, शिवदूत गटप्रमुख, आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या महत्त्वपूर्ण मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.
दर्शना बंगला भाग्यनगर येथे आयोजित या मेळाव्यास साडेतीनशे बूथप्रमुख, चारशेवर शिवदुत , तीनशे गटप्रमुखासह महत्वाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात प्रचार कसा करायचा, मतदान कसे करून घ्यायचे, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सर्व समाजघटकांसाठी घेतलेले निर्णय लोकांना कोणत्या पद्धतीने सांगायचे, तसेच माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पदावर नसतानाही मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे सुरू केली आहे. त्याबाबत माहिती द्यायची. लाडकी बहीण योजना, मेडिकल कॉलेज, पाणीपुरवठा योजना, एक रुपयात शेतकरी पिक विमा योजना, महिलांच्या अनेक योजना, अशा शहर व ग्रामीण भागात राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. जनतेची सेवा, सुरक्षा आणि विकास या आधारावर विकासपुरुष अर्जुनराव खोतकर यांच्या पाठीशी जनमत तयार झाले आहे. फेकाफेकी, उर्मट भाषेचा वापर आणि नुसतीच शेरोशायरी करणाऱ्यांना जनतेने ओळखले असून अर्जुनराव खोतकर यांचा विकासरथ आणि विजयरथ कोणीच रोखू शकणार नाही असा दुर्दम्य विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्यास अर्जुनराव खोतकर, पंडितराव भुतेकर, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, कालींदाताई ढगे, भास्करराव मगरे, विष्णू पाचफुले ,आत्मानंद भक्त, श्रीकांत पांगारकर, महेश दुसाने ,विजाताई चौधरी, फिरोज आला तांबोळी, आदींनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.सुयोग कुलकर्णी, गणेश सुपारकर, संतोष मोहिते, दिनेश भगत, योगेश रत्नपारखे ,अमोल ठाकूर, सविता किवंडे, दिनेश भगत, योगेश रत्नपारखे, अमोल ठाकूर, अजय कदम, गणेश मोहिते,दीपक वैद्य, किरण शिरसाठ, शुभम टेकाळे, अंकुश पाचफुले ,जफर खान ,उज्वलाताई फोपलीया, लक्ष्मण आप्पा अवघड, गोपी किशन गोगडे, निखिल पगारे, किशोर पांगारकर यांच्यासह बुथ प्रमुख शिवदूत गटप्रमुख शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवारी महारॅलीने भरणार उमेदवारी
मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी *महा रॅली काढून महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुनराव पंडितराव खोतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे .मामा चौक येथून सिंधी बाजार- फुल बाजार सराफा रोड- कादराबाद -पाणी वेस्ट -मंमादेवी- गांधी चव्हाण- शनी मंदिर मार्गे भाग्यनगर येथे महारॅली चा समारोप सभेने होईल. या महा रॅलीस पदाधिकारी बूथ प्रमुख गट प्रमुख शिवदुत यांच्यासह कार्यकर्त्यांनी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उमेदवार अर्जुनराव खोतकर यांच्यासह संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर ,युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे ,महिला जिल्हाप्रमुख कालींदाताई ढगे ,शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, यांनी केले.