जालना : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमिवर दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सक्षम ॲप तयार केले आहे. तरी सक्षम ॲप त्याबाबतची माहिती सर्व दिव्यांग मतदारांना होणे आवश्यक आहे. सर्व गोष्टींची प्रचार व प्रसिध्दी तसेच दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृत्ती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या हेतुने जालना येथील गुरुगणेश अंध विद्यालय जनजागृत्तीपर कार्यक्रम पार पडला. जनजागृतीपर कार्यक्रमास दिव्यांग नोडल अधिकारी तथा समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनंत कदम, दिव्यांग आयकॉन डॉ. निकेश मदारे, प्राचार्य रमेश नाहार, सहायक नोडल अधिकारी अतिश ससाणे आदि प्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने राज्यामध्ये बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग व्यक्तीसाठी मदत कक्ष व त्यांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सोयी- सुविधा आदिची दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करुन त्यांना मतदानास प्रोत्साहित करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती तसेच शाळेतील दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत दिव्यांग व्यक्तीसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाबाबत मार्गदर्शन करुन बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांनी मतदान अवश्य करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयातील दिव्यांग शिक्षक व कर्मचारी तसेच श्री. अंबोरे, श्री, कापसे, श्री. मनगटे, श्री. कांबळे, श्री. जाधव, श्री. चाबुकस्वार उपस्थित होते. असे कळविण्यात आले आहे.