विधनसभान निवडणुकीची प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून बीएलओ मार्फत घरोघरी पोलचिट वाटपास सुरुवात करण्यात आली. सोमवार दि.11 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता संभाजीनगर भागात बीएलओ यांनी घरोघरी जावून पोल चिटचे वाटप केले. बीएलओ हे रोज सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत घरोघरी जावमन पोलचिट वाटप करीत आहेत.
पोलचिट वाटप करण्यासाठी बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आली. कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहु नये तसेच त्याला मतदान प्रक्रीया अत्यं सोपी वाटावी, मतदान करण्यासाठी जातांना वेळेची बचत व्हावी यासाठी घरोघरी जावून पोल चिटचे वाटप करण्यात येत आहे. मतदारांना त्यांचे मतदान केंद्र नेमके कुठे आहे, पार्ट नंबर, बुथ क्रमांक, पत्ता आदी माहिती या पोल चिटमुळे मिळत असते.
जालना शहरातील प्रत्येक वार्डात बीएलो जात असून मतदारांना पोल चिटचे वाटप करण्यात येत आहे. मतदारांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलचिट वाटप करतांना कोणताही मतदार हुकणार नाही याची काळजी बीएलओ घेत आहेत.