अंबड/प्रतिनिंधी
९८ व्या दत्त जयंती संगीत महोत्सवाचा उत्साहात समारोप झाला. या महोत्सवाचे या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ठ कला सादरीकरणा सोबतच फ्रेंच परदेशी पर्यटकांनी लावलेली हजेरी. फ्रेंच पर्यटक व्हिन्सेंट पास्किनेल्ली यांच्या सोबत दोन पर्यटक महिलांनी उपस्थिती लावली.
शनिवार १० डिसेंबरला महोत्सवाच्या दुसर्या दिवशी शंकर गुट्टे यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. गुंजन शिरभाते यांचे व्हायोलीन, नंतर महागामी गुरूकुलाच्या शिष्या शीतल भांबरे, ऐश्वर्या मुंदडा, भार्गवी मेथेकर, आद्या शिंदे, समृद्धी सोनटक्के यांनी ओडिसी नृत्य सादर केले.
निषाद व्यास सारख्या तरूणाचा रसरशीत मालकंस, सौरभ नाईकचा फुललेला बागेश्री, पंकज देशपांडेचा रसाळ जोगकंस, गुंजन शिरभातेने व्हायोलीनवर आणि सुस्मिरताने डवाळकरने गायनातुन रंगवलेला यमन, याचा आनंद रसिकांनी मनसोक्त घेतला.यावेळी मल्हारीकांत देशमुख, डाँ.विलास मोरे, रामभाऊ लांडे, आकाश डोमने उपस्थित होते.
पं. गणपती भट, पं. हेमंत पेंडसे, विलायत खां यांचे शिष्य पं. नरेंद्र मिश्रा हे तर ज्येष्ठ प्रतिष्ठित नामांकीत कलाकार.यांच्या गायन वादनाला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत वारंवार आपल्या रसिकतेची साक्ष दिली.तरूणांनी या महोत्सवावर सर्वच बाजुने छाप उठवली याचा विशेष आनंद.एखाद्या समस्येवर उपाय म्हणजे ‘तरूणोपाय’ असं आपण म्हणतो. मराठवाड्यात शास्त्रीय संगीत चळवळ वाढवण्यासाठी हा तरूणांचा सहभाग प्रतिसाद त्या दृष्टीनेच मला महत्वाचा मानावा लागेल.महोत्सवाची सांगता पं. विश्वनाथ दाशरथे यांच्या गायनाने झाली.सुत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले.