2
भोकरदन :- भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील उद्योजक मधुकर सहाने यांच्या आजी सोनाबाई येडुबा सहाने यांचे गुरुवारी ८ डिसेंबर रोजी दुखःद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ९५ वर्षे होते.त्यांच्या पश्च्यात ३ मुली,जवाई, सुना, नातवंड असा दीर्घ परिवार आहे.
समाजाच्या प्रचलित प्रथा परंपरेप्रमाणे मृत्यूनंतरच्या अनेक विधी असतात.याप्रमाणेच सोनाबाई सहाने यांच्या मृत्यु नंतर रुख्मनबाई,पर्यागबाई,कासाबाई या तीन मुलींनी सर्व एकञ करुन निर्णय घेतला व रक्षाविधी शेतात पुरून त्याठिकाणी वृक्ष लागवड केली आहे.या वृक्षाचं संगोपन करून आईची आठवण म्हणून समाजासाठी नवीन आदर्श ठेवला आहे.
आजी हयातीत, आजारपणात नातसुन व मुलींनी चांगली सेवा केली.बऱ्याचदा मृत्यूनंतर रक्षा जिल्हयाबाहेर घेऊन जावे लागते.ज्यामधून अनेकदा अपघात झाल्याचे ऐकिवात आहे.आजीच्या मृत्यूचे दुखः आम्हाला आहे परंतु त्यांचे संस्कार आम्हाला योग्य दिशेने घेऊन जात आहेत.मुलींच्या इच्छेप्रमाणे शेतातच रक्षाविसर्जन केले.सहाने परिवाराच्या या आदर्श उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.समाजात सुधारणा करण्यासाठी काही गोष्टी ह्या स्वतः पासून सुरू करणे आवश्यक आहे.याचे उत्तम उदाहरण सहाने परिवाराने दाखवून दिले आहे.मृत्यू हा एक उत्तम संस्कार आहे.दर वर्षी भयंकर दुष्काळाच्या झळा बसलेल्या महाराष्ट्राने वृक्ष लागवड व संगोपनाचे उद्दिष्ट समोर ठेवुन दुखःद प्रसंगीही सहाने परिवाराने ठेवलेले हे उदाहरण नक्कीच अनुकरणीय आहे.