जमिनीच्या वादातून भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव येथील रुख्मनबाई साळूबा डोळे, पंखाबाई बालाजी चव्हाण यांनी आज मंगळवारी(दि. १३) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी त्यांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पोलीस कॉन्स्टेबल मानसिंग बावरे, महिला कॉन्स्टेबल मेगा नागलूट, यांनी दोन्ही महिलेसह पेट्रोल ची बॉटल ताब्यात घेतली.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, बोरखेडी गायके येथे गट क्र १८७ व ८७ ह्या गटावर अतिक्रमण केले व तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वरिष्ठचे आदेश पत्र फेटाळून त्याचे फेरफार केले आहे. या विषयी निलम्बीचे म्हणून विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी जवळ बरेच अर्ज केले तरीही न्याय मिळाला नसल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.
कर्मचारी कोणत्याही आदेशाचे पालन करीत नाहीत. गट क्र १८७ व ८७ ह्या गटावर वारीष्ठाचे आदेश फेटाळून अतिक्रमण झालेले आहे. ते अतिक्रमण हटवून व खरेखोटे पाहून जो अधिकारी असेल त्याला निलंबित करावे, या मागणीसाठी आज या महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.