जनतेतून थेट नगराध्यक्ष माझाच होणार असल्यानं सत्ताधाऱ्यांची महापालिका करण्यासाठी उठाठेव, गोरंटयाल यांचा खोतकरांचं नाव न घेता हल्लाबोल.
नगर परिषदेचं महापालिकेत रुपांतर करण्यासाठी 3 लाख लोकसंख्येची अट आहे.2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ही 2 लाख 80 हजारांच्या जवळपास आहे.तरीही जनतेतून कैलास गोरंटयाल यांचाच थेट नगराध्यक्ष होत असल्याच्या भीतीपोटी सत्ताधाऱ्यांनी जालना नगरपरिषदेचं रूपांतर महापालिकेत करण्याचा कुटील डाव रचल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी नाव न घेता माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर केला आहे.शिवाय महापालिका झाल्यानंतर ती चालवणार कशी.? हे व्यासपीठावर येऊन जाहीर करा,असं आव्हान देखील त्यांनी महापालिकेचा हट्ट धरणाऱ्या स्थानिक नेत्यांना दिलं आहे.
सध्या जालना नगरपरिषदेला वर्षाला 40 कोटी रुपये सहाय्यक अनुदान मिळतं.नगर परिषदेचं रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर हे अनुदान बंद होणार आहे.त्यामुळे महापालिका कशी चालवली जाणार.?कर्मचाऱ्यांचे पगार आणि विकासकामे कशी करणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.सध्या नगरपरिषदेला मिळणाऱ्या 40 कोटी रुपयांच्या अनुदानातूनच कर्मचाऱ्यांचे पगार आणि शहरातील कामं होतात.पण हेच अनुदान महापालिका झाल्यानंतर माजी राज्यमंत्र्यांचं षडयंत्र सुरु असून महापालिकेचे फायदे आणि नगर परिषदेचे तोटे सांगा असं आव्हान त्यांनी खोतकर यांना दिलं.