मुलगा असो अथवा मुलगी दोघांमध्ये कोणताही भेदभाव करणे योग्य नाही. गेल्या अनेक दिवसांपासून स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काही व्यक्ती मुलगी जन्माला आली म्हणून महिलेला मारहाण करतात. अशीच एक घटना पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडाली आहे. एका प्लास्टिकच्या पिशवीत स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात ही घटना घडली आहे. शहरातील वरखेडी नदीपात्रात एक स्त्री जातीचे नवजात बालक प्लास्टिकच्या पिशवीत बेवारस स्थितीमध्ये आढळून आले आहे. सदर घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे बाळ नेमके कुणाचे आहे? त्याला असे कोणी टाकले? अशा चर्चा परिसरात सुरु आहेत.
नदी पात्राजवळ लाहान बाळाच्या अनेक व्यक्ती मुलगी झाल्यावर अशा पद्धतीचे घृणास्पद कृत्य करतात. आता देखील एवढ्या लहान बालकाला प्लास्टिकच्या पिशवीत फेकून दिल्याने सर्वच स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेत दोषींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
रडण्याचा आवाज येत असल्याने एका व्यक्तीने जरा पुढे जाऊन पाहिले असता त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत स्त्री जातीचे अर्भक दिसले. या नंतर पोलिसांना याची माहिती देत पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची वैद्यकीय चाचणी केली असता बाळ सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.