- परतूर, दि.१५ – सुदृढ शरीरासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन मराठवाडा सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव कपिल आकात यांनी केले.
शुभंकरोती फाउंडेशन नांदेड, देसाई फाउंडेशन ट्रस्ट व स्कोर एस.ई. इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शिवाजीनगर भागातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात गुरुवारी (दि.१५) आरोग्य मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
डॉ.ज्ञानेश्वर नवल,डॉ.रवी गायकवाड, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे,मुख्याध्यापक वसंत सवणे,उपमुख्याध्यापक डॉ.शेषराव वायाळ कार्यक्रमातला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आकात पुढे बोलताना म्हणाले की, मुलांनी विद्यार्थी दशेपासूनच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मैदानावर जाऊन विविध प्रकारचे खेळ खेळावे.मोबाईलचा अनावश्यक वापर करू नये. टी. व्ही.जास्त वेळ पाहू नये.वेळी-अवेळी फास्ट फूड खाऊ नये. आरोग्यवर्धक सवयी जोपासाव्या.सुदृढ आरोग्य ही जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे असे ते शेवटी म्हणाले.
शुभंकरोती फाउंडेशनचे अभिजित बारडेकर यांनी प्रास्ताविक केले.तर याप्रसंगी डॉ.ज्ञानेश्वर नवल,पोलीस निरीक्षक शयामसुंदर कौठाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
डॉ.हनुमान खंदारे,डॉ.भाग्यश्री खंदारे, डॉ.रवी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
ज्ञान-मनोरंजन या उपक्रमाअंतर्गत यावेळी विविध प्रकारचे खेळही घेण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक राजकुमार राऊत,त्र्यंबक घुगे यांच्यासह चित्रा चौधरी,कोमल केंद्रे,स्नेहा गवई,वैशाली सुरंग,स्वप्नजा गोरे,स्वाती निर्वळ,रेणुका कुलकर्णी,ओंकार मठपती इतरांची उपस्थिती होती.