भोकरदन : नुकत्याच पारपडलेल्या क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धा २०२२-२३ संपन्न झाल्या.या क्रीडा स्पर्धा मध्ये भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्था संचलित श्री गणपती इंग्लिश/मराठी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे जालना जिल्ह्यात वर्चस्व राहिले असुन या शाळेच्या सर्वाधिक विद्यार्थी अनेक खेळामध्ये अव्वल आले असून या शाळेच्या जास्त जास्त विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धा साठी निवड झाली आली असून या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जालना येथे झालेल्या १४ वर्षीय मुलांच्या व्हाँलीबाँल स्पर्धा मध्ये कर्णधार करण मोरे च्या नेतृत्वाखाली शिवाजी काळे,सोएब तडवी,रिहाण तडवी, आमन तडवी रामेश्वर सोनवणे या खेळाडूंच्या संघाणे विजय मिळविल्या बदल त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे
१७ वर्षीय गट मुलांच्या कुस्ती स्पर्धेत सचिन तुळशीराम मेंगाळ हा तर १४ वर्षीय गट मधून करण संतोष मोरे या मल्लाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
१७ वर्षीय वयोगटातील मुलांच्या धनुर्विद्या(आरचरी) स्पर्धेत ओम मधुर तळेकर याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे
१४ वर्षीय गटातील मुलांच्या मैदानीखेळात गोळाफेक मध्ये करण संतोष मोरे याची विभागीय स्तरावर तर १०० मीटर धावणे मध्ये तो द्वितीय व ८० मीटर आडथळा शर्यत मध्ये तो प्रथम आला आहे तर थाळी फेक मध्ये शिवाजी कडुबा काळे द्वितीय आला आहे
१४ वर्षीय मुलीच्या गटातून थाळी फेक व उंच उडी खेळात कु निशा राजु आहिरे या विद्यार्थ्यांनीची विभागीय स्तरावर निवड झाली आहे
तर शाळेतील विद्यार्थी १४ वर्षीय गटातून ४०० मीटर धावणे स्पर्धेत शिवाजी कडुबा काळे जिल्हास्तरावर तिसरा व ४×१०० मीटर रिले संघ तिसरा, १७ वर्षीय वयोगटातील ४×४०० मीटर रिले स्पर्धेत शाळेचा संघ जिल्ह्यात तृतीय आला आहे
या विजयी विद्यार्थ्यांचा व क्रीडा शिक्षकांचा संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, संस्थेच्या कोषाध्यक्षा तथा नगराध्यक्षा सौ मंजुषाताई देशमुख,संचालक इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या विजयी विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावरील स्पर्धा साठी संस्थेच्या संचालक मंडळाने व गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, केंद्रप्रमुख आर एच सोनवणे, तालुका क्रीडा संयोजक तथा जि प हायस्कूलचे मुख्याध्यापक कृष्णा पाटील जंजाळ, शाळेचे प्राचार्य आर आर त्रिभुवन, जे आर सपकाळे, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, क्रीडा शिक्षक गौतम खाडे, अशोक नवगिरे, सुरेश भोसले यांच्या सह शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.