कुंभारी :- निर्मला जवळे हिवाळा संपून उन्हाळा चालू होण्याच्या संक्रमणाचा कालावधी सुरू झाला आहे. यावर्षी सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. सकाळी थंडी,दुपारी उन्हाचा कडाका आणि संध्याकाळी थंडीचे वातावरण अशा बदलत्या हवामानाचा दिनक्रम चालू झाल्याने नागरिकांना विविध व्याधींचा त्रास चालू झाला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पिकाची वाढ खुंटली असून दुभत्या जनावरांचे दूधही आटले आहे.
हवेतील धुळीमुळे जीवाणू, विषाणूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वयस्कर, तरुण, लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला, जुलाब, उलटी, ताप, दमा, थकवा यासारख्या रोगराईची लक्षणे दिसू लागली आहेत.
गावागावांतील छोटे-मोठे दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसत आहे. दुपारी अचानक वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. थकवा येणे, चक्कर येणे यासारखे प्रकार उष्णतेमुळे घडत आहेत.
कोरडे हवामान व कडक उन्हामुळे पिकांमधील पाण्याचे बाष्पोउत्सर्जन होऊन पिकांवर पाण्याचा ताण पडत आहे. यामुळे वाढ खुंटत असून अतिरिक्त पाण्याची गरज भासू लागली आहे.
वारंवार बदलणाऱ्या वातावरणाचा दुभत्या जनावरांच्या दुधावर परिणाम झाला आहे. ओला, सुका चारा,
खुराक, खाद्य भरपूर प्रमाणात खाऊनदेखील हवामान बदलामुळे दुधाचे प्रमाण घटले आहे. याचा आर्थिक फटका दूध उत्पादकांना बसत आहे.
कुंभारी:- हिवाळा संपून उन्हाळा चालू होण्याच्या संक्रमणाचा कालावधी सुरू झाला आहे. यावर्षी सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. सकाळी थंडी,दुपारी उन्हाचा कडाका आणि संध्याकाळी थंडीचे वातावरण अशा बदलत्या हवामानाचा दिनक्रम चालू झाल्याने नागरिकांना विविध व्याधींचा त्रास चालू झाला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पिकाची वाढ खुंटली असून दुभत्या जनावरांचे दूधही आटले आहे.