कुंभारी:- गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात आधुनिकता आणली. जनतेच्या आरोग्याच्या हिताचे अनेक निर्णय घेत विकासाचा कायापालट केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी वळसंग येथे केले. ते दक्षिण तालुक्यातील वळसंग येथील ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळीबोलत होते.
साडेचार कोटी खर्चून उभारलेल्या नवीन ग्रामीण रुग्णालय 30 बेडचे असून उपसंचालक कार्यालयाकडून रुग्णालयास अत्यावश्यक असणारी सर्व साहित्यांची खरेदी केले आहे. आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा आणि सुसज्ज असलेल्या या इमारतीचे लोकार्पण सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळीप्राचार्य शिवाजीराव सावंत, पुणे आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार, जिल्हा शलचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अमोल कापसे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, डॉक्टर सुहास माने, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ,हरिभाऊ चौगुले, वळसंग चे सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच आरिफ कुरेशी, वळसंग एपीआय अनिल सनगल्ले,संजय देशमुख, समीर कटरे आदी उपस्थित होते.