भोकरदन : भोकरदन तालुक्यातील संग्राम केंद्र यांना ग्रामीण भागात शासनाच्या वतिने परवानगी देण्यात आली असुन अनेक ठीकाणी केंद्र संचालाकडून काम होत नसल्याचे आढळून आल्याचे दिसुन अल्याने सदरिल संग्राम चालकानी येथील बर्याच झेरॉक्स मशीन दुकानदारांना आपली आयडी दिली असून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मांगणी येथील महा ई सेवा चालकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सदरील संग्राम केंद्र हे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी देण्यात आले आहे, शासनाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरीकांचे कामे गावातच व्हावीत, परंतु प्रत्यक्ष सदरील केंद्र चालक हे दिलेल्या ठीकाणी केंद्र न चालवता इतर ठीकाणी चालवत आहे. त्यामुळे गावातील नागरीकांना नाहक त्रास सहन करवा लागत आसल्याचा आरोप देखील निवेदनात नमुद करण्यात आला आहे , दरम्यान भोकरदन येथे काही झेरॉक्स मशिनच्या दुकानात आपली आयडी देउन दलालामार्फत चालविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तालुक्यात ज्यांना आयडी दिली आहे अशावर शासनाची कोणत्याच प्रकारचे शासनाचे नियंत्रन दिसत नाही. त्यामुळे नागरीकाची लुट होत असल्याचे चित्र दिसत आहे. उलट यांच्या मार्फत प्रमाणपत्र काढले तर संबंधीत तहसिल ऑपरेटर व्दारा लगेच देण्यात येते. तसेच तहसील कार्यालयाची आयडी व पासवर्ड दलालकाडे देण्यात आलेले आहे. त्याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील संग्राम केंद्राना चाप बसनार की असीच लुट चालु राहणार. तसेच बरेचसे संग्राम केंद्र चालक यांच्या व्यास प्रमाणपत्राचे एडीट करुन बनावट प्रमाणपत्र दिले जातात त्यामुळे विदयार्थी तसेच शासनाची फसवणूक केली जाते व ही बाब खुप गंभीर असल्याचा आरोप आहे.
सदरील बाब संग्राम केंद्र जिल्हा समय यांचे वारवार लक्षात आनुन देण्यात आलेली आहे. ‘मारोती काशीनाथ शिंदे यांची आयडी बेलोरा येथील असुन तर राजेंद्र दळवी दानापूर, संजय जाधव ,रावसाहेब पवार, योगेश वराडे नळनी यांच्या आयडीची चौकशी करुन योग्य कारवाई करावी असे शेवटी निवेदनात नमुद करण्यात आले आहे या निवेदनावर दिपक बोर्डे, हुसेन पठाण, कैलास रजाले, दत्ता बरडे, व्ही.बी .गायकवाड, विनोद पारधे, ऊभा शेजूळ, एकनाथ पांडव यांच्यासह आदीच्या स्वाक्षर्ऱ्या आहेत.