जालना – फिल्ड आर्थरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सांगलीच्या वतीने लक्ष्यभेद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 व्या राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर आर्चेरी स्पर्धेत जालना येथील यग्नेश कपील भुरेवाल याने राज्यस्तरीय सिल्वर मेडल पटकाविले.
या स्पर्धा सांगली येथे पार पडल्या. जालना येथील नारायणी इंग्लीश स्कुलचा विद्यार्थी यग्नेश कपील भुरेवाल यानेही या स्पर्धेत सहभाग नोंदिवला. व त्याने सिल्वर मेडल पटकावून जालना शहराचे नांव उंचावले. यग्नेश भुरेवाल यास सिल्वर पदक शिक्षक डॉ. हेमंत वर्मा यांनी प्रदान केले. त्याच्या या यशाबद्दल यग्नेश भुरेवाल याचे दैनिक कृष्णनितीचे संपादक संजय भरतीया,मयुर अग्रवाल, रवि अग्रवाल, मनोज अग्रवाल, महेश कोळेश्वर यांच्यासह इतरांनी कौतूक केले.