दरवर्षी 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात येतो, परंतु यावर्षी 18 डिसेंबर रोजी जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने 19 डिसेंबर सोमवार रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात येणार होता, परंतु सोमवारी सुद्धा अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यासाठी प्रशासनातील कोणीही अधिकारी फिरकले नाही, तसेच अल्पसंख्यांक समाजातील प्रतिष्ठित नागरीक, विविध अल्पसंख्यांक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या दिना ची नोंद न घेतल्यामुळे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला नाही.
अल्पसंख्याक हक्क दिनाचा जिल्हा प्रशासनास विसर पडल्याने आज सोमवार (दि.१९) रोजी अल्पसंख्यांक समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्यध्यक्ष अब्दुल रफिक, जावेद खान अय्युब खान, मो. एकबाल कुरेशी, तय्यब देशमुख व इतरांची प्रमुख उपस्थिती होती.
मो. एकबाल कुरेशी यांनी अल्पसंख्याक हक्क दिन
उत्साहात साजरा करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाने केले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली. तय्यब बापू देशमुख यांनी अल्पसंख्याक हक्का दिन नियोजन करणे बाबत नोव्हेंबर महिण्यापासून कागदोपत्री अर्ज केले, पण त्याची प्रशासनाने नोंद घेतली नाही. म्हणून खंत व्यक्त केली. जावेद खान यांनी वक्फ मंडळे अल्पसंख्याक शाळांची संच मान्यता 2014-15 पासून प्रलंबित आहे. शासन स्तरावर त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी केली.
अब्दुल रफिक यांनी अल्पसंख्याक योजनाच्या तसेच सच्चर कमिटीचा 15 कलमी अहवाल केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विषयी प्रशासानाने विशेष काळजी घ्यावी म्हणून विनंती केली. शासनाने जारी केलेल्या शासन – निर्णय एसएसएन 2019/प्र. क्र. 111 / टीएनटी-2 दि. 12-12-2022 त्वरीत रद्द करावे कारण की त्यात आल्पसंख्याक शाळामधील शिकविणाऱ्या अंशत: अनुदानित शिक्षकांच्या उल्लेख केला गेला नाही. खुले प्रवर्गातील नियम अल्पसंख्याकांवर थोपण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. शासनाने अल्पसंख्याक शाळावरील विदयार्थी संख्या प्रती वर्ग शहरी भागात : 20 व ग्रामीण भागात 15 या आधारे संच मान्यता 2022-23 मध्ये संच मान्यतेचे निकाव तयार करून त्या आधारे अल्पसंख्याक शाळावरील कार्यरत अंशत: अनुदानित शिक्षकांना पुणे पणे सेवा संरक्षण द्यावे सदर शासन निर्णयात आल्पसंख्याक शाळाचा उल्लेख ना केल्याने अल्पसंख्याक समाजाला राज्य शासनाकडून वगळण्याचा प्रयत्न होत आहे.
तरी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली.