जालना । जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि. 26 डिसेंबर रोजी उपोषणा दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा बळवंत गायकवाड असं या महिलेचं नाव असून त्या मागच्या चाळीस दिवसांपासून आमरण उपोषणाला बसल्या होत्या. दरम्यान या घटनेनंतर मृत महिलेचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. जो पर्यंत प्राचार्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
माजी सैनिकाला दिलेली जमीन परस्पर औद्योगीक प्रशिण संस्थेला वर्ग केली होती. त्यामुळे त्यांना शानाने दिलेल्या जमीनीवर कामकाज करीत असतांना औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि इतर काही शिक्षकांनी माजी सैनिकाच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे सदरील प्राचार्य आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या 40 दिवसापासून माजी सैनिकाच्या पत्नी व नातेर्वाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण स्थळी वृध्द महिलेचा मृत्यु; 40 दिवसापास… https://t.co/UnPJf5hzYn via @YouTube
— Hirkani News (@hirkaninews) December 26, 2022
औरंगाबाद रोडवरील सर्वे नंबर 49/38 या जमिनीचा वाद न्यायालयात सुरु आहे. त्याचबरोबर या जागेवर आयटीआय कॉलेजचे प्राचार्य यांना जाण्यास कोर्टानं सक्त मनाई केली होती. मात्र त्यानंतर आयटीआय कॉलेचचे प्राचार्य दोन शिक्षकासह तिथे आले होते आणि गायकवाड यांच्या सुनेसह नातीस छेडछाड करून शिविगाळ केली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी वनमालाबाई राजेंद्र गायकवाड या त्यांच्या कुटुंबासह मागच्या चाळीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. आज उपोषणा दरम्यान त्यांच्या सासू कस्तुरबा बळवंत गायकवाड यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मृत महिलेचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. जो पर्यंत प्राचार्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, चंदन झिरा पोलीस ठाण्याचे पोनि. आर. नाचण, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोनि. सय्यद मजहर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978
आपणही पुढील मेलवर बातम्या पाठवू शकता
Mob. No. : 9850516724
मेल : hirkaninews@gmail.com