राज्यपाल भगतसिंह कोश्यायरी यांना पदावरुन हटविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत. त्यांनी केलेले वादग्रस्त विधाने आणि महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात मोठे वादळ निर्माण झाले आहे. मोर्चे, आंदोलने आणि तक्रारी करुनही त्यांना हटविले जात नसल्याने जालना येथील किरणराजे देशमुख यांनी राष्ट्रपती यांना चक्क रक्ताने पत्र लिहीले असून राज्यपाल यांना तात्काळ पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे.
25 डिसेंबर 2022 पासून सर्व शिवभक्ताच्या वतीने पत्र पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज किरणराजे देशमुख यांनी स्वतःच्या रक्ताने राष्ट्रपती यांना पत्र लिहुन राज्यपाल यांना पदावून हटविण्याची मागणी केली. राज्यपाल कोश्यायरी यांना पदावरून हटवणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे किरणराजे देशमुख यांनी म्हटले आहे. पत्र लिहीण्यासाठी कलाशिक्षक कृष्णकांत मल्लेकर यांनी केले सहकार्य केले असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978
आपणही पुढील मेलवर बातम्या पाठवू शकता
Mob. No. : 9850516724
मेल : hirkaninews@gmail.com