केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे बहुजनांचे कैवारी आहेत. त्यांनी जनमानसाला न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला असून आजही ते केंद्रीय मंत्रीमंडळात राहुन सर्वसामान्यांचे प्राधान्याने कामे करीत आहेत असे प्रतिपादन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे युवा नेते महेंद्र रत्नपारखे यांनी केले. जालना शहरातील नुतन वसाहत येथील विसावा नगर परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेसय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष सतिष वाहुळे, युवा नेते महेंद्र रत्नपारखे, विजय खरात, अनिल खिल्लारे, स्वप्निल गायकवाड, अमोल रत्नपारखे, आनंद म्हस्के, फकीरा साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.