थर्टी फस्टच्या पुर्व संध्येला जालना शहरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला असून वांग्याच्या भाजीत चक्क मेलेला उंदीर निघाला आहे. त्यामुळे ग्राहकाने हॉटेलमध्येच गोंधळ घातलाय. जालना शहरातील प्रसिद्ध मधुबन हॉटेल मध्ये दि. 30 डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेत ही घटना घडली. हा सर्व प्रकार ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापनाच्या समोर आणला असला तरी हॉटेल व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आली नाही. मात्र ग्राहकाने हॉटेल मालकावर कारवाईची मागणी केली आहे.
रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी हिरकणी चॅनलला सब्सक्राईब नक्की करा…
जालन्यातील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल मधुबनमध्ये ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वांग्याच्या भाजीत मेलेला उंदीर आढळून आल्यानं ग्राहकानं गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावर हॉटेल व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आज दुपारच्या सुमारास दोन मित्र जेवण्यासाठी मधूबन हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी राईस प्लेट आणि वांग्याची भाजी ऑर्डर केली. मात्र यावेळी वांग्याच्या भाजीत मेलेला उंदीर आढळून आला. त्यामुळे ग्राहक देखील चांगलेच संतापले आणि त्यांनी याचा हॉटेल मालकाला जाब विचारत गोंधळ घातला.
हॉटेल चालकाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून हॉटेलचालक तसेच अन्न आणि औषधी प्रशासनाच्या अधिकार्यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं ग्राहकांनी म्हटलंय. त्यामुळे सर्वच हॉटेल मालकाचे धाबे दणानले आहेत. या प्रकारामुळे आता सर्वच हॉटेलची तपासणी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978
आपणही पुढील मेलवर बातम्या पाठवू शकता
Mob. No. : 9850516724
मेल : hirkaninews@gmail.com