दिनांक 30 रोजी सकाळी 8.00 वाजे चे पुर्वी जालना शहरातील शंकरनगर एन. आर. बी कॉलनी येथील महीला इंदु किशोर आटोळे (वय 42 वर्षे), मुळ रा. शेळगाव आटोळ ता. चिखली जि.बुलडाणा या महीलेचा खुन झाल्याची प्राथमिक माहीती पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन महीलेस सामान्य रुग्णालय जालना येथे आणले होते. तेथे वैद्यकीय अधीकारी यांनी तपासुन ती दाखल करण्यापुर्वी मयत झाली असल्याचे घोषीत केले होते.
त्यानंतर मयत हीची बहीण प्रतिभा आटोळे यांचे तक्रारी वरुन सदर मयत महीलेचा पती किशोर हिंमतराव आटोळे (वय 45 वर्षे), रा. शेळगाव आटोळ, ता. चिखली जि. बुलडाणा सध्या रा. शंकरनगर, जुना जालना याचेविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयातील आरोपी हा गुन्हा केल्यापासुन फरार झाला असल्यांने कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.ए.सय्यद यांनी पोउपनि नांगरे, पोउपनि शिंदे यांना तपासाबाबत सुचना देऊन तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्याकरीता रवाना केले होते.
पोलीस आरोपीचा शोध घेत असतांना सदर आरोपीस जालना शहरातील जुने तहसिल भागातून ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधीकारी निरज राजगुरू, कदीम जालनाचे पोलीस निरीक्षक सय्यद मझहर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.चव्हाण, पोउपनि ज्ञानदेव नागरे, पोउपनि गणेश शिंदे, पो.ना. किरण चेके, पोकॉ खलील सय्यद, पोकॉ रामेश्वर राउत, पोकॉ दिलीप गायकवाड, पोकॉ संदीप चव्हाण, पोकॉ अजीम अन्सारी, पोकॉ जारवाल, पोकॉ राउत तसेच वाहतुक शाखेचे पोना गणेश जाधव यांनी कामगीरी पार पाडली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि शिंदे हे करीत आहेत.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978
आपणही पुढील मेलवर बातम्या पाठवू शकता
Mob. No. : 9850516724
मेल : hirkaninews@gmail.com