जालना ( प्रतिनिधी) : आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत चढ- उतार येत गेले, मात्र पत्रकारांनी सदैव आपल्याला मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य व साथ देऊन मोठे केले असून पत्रकारांचे योगदान आपल्या दृष्टीने सदैव अतुल्य आहे. अशा भावना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आज व्यक्त केल्या.
खोतकर यांचा वाढदिवस आणि आगामी दर्पण दिनाचे औचित्य साधून शहर प्रमुख प्रा. डॉ. आत्मानंद भक्त यांच्या वतीने रविवारी ( ता. 01) एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार ह. भ. प. बाबुराव व्यवहारे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, प्रा. डॉ.आत्मानंद भक्त, मेघराज चौधरी, शैलेश देवीदान, युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे ,अमोल ठाकूर,गणेश मोहिते, संतोष जांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले, सामान्य माणसाला मोठे करण्याची ताकद असलेल्या प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अहो़-रात्र मेहनत घेत असतात. क्रीडा क्षेत्राशी निगडित असलेल्या डॉ . आत्मानंद भक्त यांनी आपल्या हस्ते पञकारांचा गौरव करून आपला वाढदिवस सार्थकी लावला. असे खोतकर यांनी नमूद केले.
प्रारंभी त्यांचे अभिष्टचिंतन तसेच पञकार आणि छायाचित्रकारांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आशीष रसाळ यांनी केले तर आयोजक तथा शहरप्रमुख प्रा.डॉ.आत्मानंद भक्त यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण काकडे, विक्की क्षीरसागर, मुन्ना ठाकूर, लक्ष्मण उंबरे, सचिन भक्त, भोला भक्त, अक्षय इंगळे, शुभम गंगाधरे, शाम मुदीराज, शेख अनवर ,शेख युनूस आदींनी परिश्रम घेतले.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978