नागपूर शहरातून एक संतापजक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम बापाने आपल्या दोन दिवसांच्या बाळाला थेट फरशीवर आपटलं. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या मेडिकल या शासकीय रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक ४६ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या नराधम बापास अटक केली आहे. गिरीष गोंडाने असं निर्दयी बापाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरच्या मेडिकल या शासकीय रुग्णालयातील वार्ड क्रमांक ४६ मध्ये एक महिला उपचारासाठी दाखल झाली होती.
यावेळी या महिलेचा पती गिरीष हा तिथे आला. दोघांमध्ये काही कारणास्तवरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीत आरोपी गिरीश याने आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला उचलून घेत थेट फरशीवर आपटलं.
या घटनेत बाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी बापाला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978