सातारा दि. ०१ जानेवारी २०२३ सातारा येथील रयत शिक्षण संस्था आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने दि. ०३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी दहा वाजता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या प्रेरणास्थानांपैकी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या एक असून त्यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संस्थेची परंपरा आहे. यंदा सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती असून या समारंभ सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. वंदना नलावडे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर , प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या समारंभात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर उहापोह होणार असून या वैचारिक मंथनाचा लाभ घेण्यासाठी सातारा आणि परिसरातील विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनिता घार्गे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. पवार, अंतर्गत गुणवत्ता सुधार समितीच्या प्रमुख डॉ. जयश्री आफळे यांनी केले आहे.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978