जालना तालुक्यातील खरपुडी येथे सैनिकी शाळेजवळ असलेला बौद्ध धम्माचा पंचरंगी ध्वज अज्ञात व्यक्तीने पाडल्याची घटना आज दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना खरपुडी शिवारातील गट नं. 197 मध्ये ही घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून तालुका पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसरातील नागरिकांनी अज्ञात व्यक्तीने ध्वज पाडल्या प्रकरणी रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केले आहे. हा धम्मध्वज पाहणार्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
घटनास्थळावर तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांच्यासह पोलीस पथक, महसूल विभागाचे पथक आणि पंचायत विभागाचे पथक दाखल झाले आहे. सध्या आंदोलकानी रस्ता रोको आंदोलन सकाळपासून सुरू केले असून गुन्हा दाखल होईपर्यंत रस्त्यावरून न उठण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978