जालना तालुक्यातील खरपुडी येथील गट क्र. 197 मध्ये लावण्यात आलेला पंचरंगी ध्वज पाडून ध्वज काढून नेल्या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खरपुडीचे सरपंच, उपसरपंच आणि सर्वच सदस्यावर धार्मीक भावना भडकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ताज्या बातम्यांसाठी हिरकणी चॅनलला सब्सक्राईब नक्की करा
खरपुडी येथे सैनिकी शाळेजवळ असलेला बौद्ध धम्माचा पंचरंगी ध्वज अज्ञात व्यक्तीने पाडल्याची घटना आज दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे गावातील काही महिलांनी खरपुढी रोडवर बसून रास्तारोको आंदोलन करायला सुरुवात केली होती. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, एपीआय खाडे, एएसआय सय्यद मज्जीद, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, डीएसबीचे एएसआय सय्यद शौकत,महिला पीएसआय तुपे, डी.एसबी चे पो. कॉ. सुनिल गांगे, पो.नाईक संदीप बेराड, किशोर जाधव, कृष्ण भडांगे, वसंत धस, लक्ष्मण शिंदे, राम शिंदे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रस्त्यावरुन उठणार नाही अशी भुमीका आंदोलकांनी घेतल्याने तालुका पोलीस ठाण्यात धार्मीक भावना भडकाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी हे करणार आहेत.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978