Saturday, April 18, 2026
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home महाराष्ट्र

पत्रकारिता पुरस्कार : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) 1,00,000/- लाख रूपये

हिरकणी टीम by हिरकणी टीम
January 3, 2023 9:33 PM
A A
पत्रकारिता पुरस्कार : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
114
VIEWS

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2023 असा आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती

अ.क्र पुरस्काराचे नाव पारितोषिक
1 अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) 1,00,000/- लाख रूपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2 बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
3 अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह वप्रशस्तीपत्र)
4 बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
5 मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
6 यशवंतराव चव्हाण पुरस्कार
शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
7 पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
8 तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
9 केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
10 समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
11 स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
12 पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार
13 दादासाहेब पोतनीस पुरस्कार,
नाशिक विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,
या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
14 अनंतराव भालेराव पुरस्कार,
औरंगाबाद आणि लातूर विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
15
आचार्य अत्रे पुरस्कार,
मुंबई विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
16 नानासाहेब परूळेकर पुरस्कार,
पुणे विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
17 शि.म.परांजपे पुरस्कार,
कोकण विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
18 ग.गो.जाधव पुरस्कार,
कोल्हापूर विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
19 लोकनायक बापूजी अणे पुरस्कार,
अमरावती विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
20 ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,
नागपूर विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

नियम व अटी
राज्य / विभागीय पुरस्कार

पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षांची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.

ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.

गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 पाठविता येतील.

शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधीत विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.

2022 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीय स्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार

महाराष्ट्र राज्याच्या बाहेर पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करणाऱ्या व आपल्या लेखणीने पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या व सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी विषयांवर सातत्याने लिहिणाऱ्या व्यक्तींना, अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) सन 2018 या वर्षापासून सुरू करण्यात येत आहे.

राष्ट्रीय स्तरावरील संपादक/पत्रकार यांनी किमान 25 वर्ष दिल्ली वा देशातील इतर प्रांतात, नामवंत व दर्जेदार दैनिक/पाक्षिक/साप्ताहिक यामध्ये काम केलेले असावे.

या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवितानाअर्जदाराने वृत्तपत्र/इलेक्ट्रॉनिक्स मिडीयामध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्वाच्या बातम्या, लेख, वृत्तविशेष इत्यादींची कात्रणे/व्हिडीओ सीडी हे त्याच्या प्रसारणाच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.

इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार यासाठीही लागू असतील.

विकास योजना संदर्भातील
समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार

ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

केंद्र शासनाचे “स्वच्छ भारत अभियान” आणि राज्य शासनाचे “स्वच्छ महाराष्ट्र अभियान” प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.

स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखन केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिध्दी, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेले जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी “पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार” देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता, उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून, पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

छायाचित्रकार पुरस्कार

“तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार” स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पूरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.

महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक कामाच्या प्रसिध्दीसाठी जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी यांचा विचार केला जाईल. एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास, तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिध्द झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख, नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोअीफोडे यांनी त्यांच्या लेखणीद्वारे समाजातील अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा यावर सातत्याने आसूड ओढले. आपल्या अग्रलेखांद्वारे प्रभावीरीत्या सामाजिक जाणीव जागृती करणारे संपादक म्हणून सुधाकर डोअीफोडे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. विविध विकास कामांची विशेषत: शासकीय विकास कामांची त्यांनी आपल्या अग्रलेखाद्वारे सकारात्मक प्रसिद्धी केली. विविध विकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.

या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.

प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे. इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.


Previous Post

जि प प्रा शा सारवाडी येथे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

रोहयोचा निधी  मुलांच्या खात्यात। गुंडेवाडी च्या महिला उपसरपंच अपात्र

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या
जालना - छत्रपती संभाजीनगर

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप
जालना - छत्रपती संभाजीनगर

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव
जालना - छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
नैसर्गिक आपत्ती अनुदानातील 1.30 कोटी रुपयांचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जालना - छत्रपती संभाजीनगर

नैसर्गिक आपत्ती अनुदानातील 1.30 कोटी रुपयांचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

December 13, 2025
104
जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी
जालना - छत्रपती संभाजीनगर

जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

May 30, 2025
130
Next Post
रोहयोचा निधी  मुलांच्या खात्यात। गुंडेवाडी च्या महिला उपसरपंच अपात्र

रोहयोचा निधी  मुलांच्या खात्यात। गुंडेवाडी च्या महिला उपसरपंच अपात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0

The Last Guardian Playstation 4 Game review

0
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025

चालू घडामोडी

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
104
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

कंत्राटदार व अधिकार्‍यांनी शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

December 13, 2025
103
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी-अंमलदारांचा गौरव

December 13, 2025
104
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

 

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.