विष्णु मगर / टेंभूर्णी प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकर्यांनी मागणी केली असून त्याबाबतचे निवेदन टेंभुर्णी येथील पाटबंधारे विभागाच्या शाखाधिका-याला दिले आहे. यावर्षी हे धरण परतीच्या पावसात शंभर टक्के भरले होते. रब्बी हंगामात दोन वेळेला रब्बी पिकांसाठी शेतकर्यांनी अर्ज भरून पाणी सोडण्यात आले होते. सध्या जीवरेखा धरणात मुबलक प्रमाणात जल साठा शिल्लक आहे. अकोला देव व टेंभुर्णी परीसरातील शेतकर्यांनी काहींनी अगोदर तर काही शेतकर्यांनी उशीरा रब्बी गहू, हरबरा,मका, बाजरी , शाळु ज्वारीची पेरणी केली होती. काही शेतकर्यांचे पिके सोंगणी व काढणीला आले आहे. तर काही शेतकर्यांना एका आवर्तनाची गरज आहे. एक पाणी जर सोडले तर शेतकर्यांची पिके तरणार आहे. नसता पाण्याअभावी शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी शेतकर्यांनी प्रदीप सोनुने शाखाधिकारी टेंभुर्णी यांना निवेदन दिले आहे. सदरील निवेदनावर अकोलादेव येथील प्रमेश्वर हरीभाऊ सवडे, टेंभुर्णीचे माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, यांच्या नेतृत्वाखाली दता जमधडे, विनोद ढवळे, कुमकर, संदीप खरात, ज्ञानेश्वर खांडेभराड ,गजानन सवडे, रतन सवडे, दामोधर सवडे, नायबराव सवडे, संजय सवडे, दत्तु सवडे, संदीप सवडे,समाधान सवडे, विठ्ठल सवडे, विलास सवडे, अप्पासाहेब सवडे, अशोक सवडे, अरूण सवडे, एस. के. सवडे, गणेश सवडे, शिवाजी सवडे, नावेद पठाण, भगवान सवडे, मल्हारी सवडे, संदीप भिसे, संतोष सवडे, मनोहर सवडे, बद्री सवडे यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या शेतक-यांच्या मागणीचा जालना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सुरेखा कोरके यांनी विचार करून जीवरेखा धरणातून पाणी सोडावे.
जीवरेखा धरणात मुबलक प्रमाणात जलसाठा असून शेतकर्यांचे रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी पिके वाळून जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अधीका-यांनी एक पाणी शेतीसाठी सोडवावे नसता आम्ही सर्व शेतकरी टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन करू – अकोलादेव टेंभुर्णी सर्व शेतकरी
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी शेतक-यांनी आमच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून आम्ही त्यांचा मागणी प्रस्ताव जालना येथील वरीष्ठ अधिका-याकडे पाठवीला असून वरीष्ठ अधिकारी यांचे आदेश आल्यावर तात्काळ शेतीसाठी पाणी सोडण्यात येईल.
– बि.आर जगदाळे, व्ही. पी. चेके पाटबंधारे उपविभाग शाखा टेंभुर्णी
जीव रेखा धरणात यावर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने आम्ही शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे रब्बीची पेरणी केली आहे.यामध्ये मका, गहू, हरभरा, बाजरी, शाळू, पिकांची पेरणी केली आहे . मात्र काही पिके नेमकी शेवटच्या टप्प्यात असून त्या पिकासाठी आणखी दोन पाण्याची अत्यंत गरज आहे . जर हे पाणी मिळाले नाही तर आम्ही पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाऊन आमचे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे पाटबंधारे विभागाने दुसऱ्या आवर्तन सोडून आमच्या पिकाला जीवदान द्यावे अशी मागणी आणि पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
– दता जमधडे शेतकरी, टेंभूर्णी




















