PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्तम सक्रिय जालना जिल्हा ला आला असून जनता हायस्कूल जालना या शाळेने राज्यातील सर्वोत्तम पन्नास शाळेत मानांकन मिळविले आहे. २ ऑक्टोबर २०२२ रोजी मा. मंत्री (शालेय शिक्षण) दीपक केसरकर यांनी Project Lets Change -स्वच्छता मॉनिटर राबवण्यास सुरवात केली होती.
ह्या आगळ्या वेगळ्या स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यांकडून साफ सफाई करून घेणे अपेक्षित न्हवते, आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हे ही अपेक्षित न्हवते. प्रकल्प संचालक रोहित आर्या ने सुचवले होते कि विद्यार्थ्यांना कोणी निष्काळजीपणे कचरा फेकताना किव्हा थुंकताना दिसले तर फक्त त्या व्यक्तीला तितल्यातिथे थांबवून केलेली चूक लक्ष्यात आणून देण्याचे काम करायचे. तितल्यातिथे दाखवून दिले गेले तर निष्काळजीपणाची सवय कायमस्वरूपी नष्ट करता येईल, त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी ची सवय लागण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प २४ डिसेंबर पर्यंत राबवण्यात आला. अनेक शाळा सक्रिय होत गेल्या आणि हजारो विद्यार्थीयांनी लोकांना असामाजिक कृत्य करण्यापासून थांबवण्याच्या अनुभवांचे विवरण फेसबुक किंव्हा इन्स्टाग्राम वर पोस्ट केले आहेत, आणि अजून ही करत आहेत. त्यामुळे प्रकल्प संपला असला तरी अनेक विद्यार्थ्यांना अशी स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची सवय झाली आहे हे दिसून येते. स्वच्छता मॉनिटर मुळे निष्काळीजीपणा ची सवय कमी होते आहे असे जाणवयला लागले आहे.
प्रकल्पात महाराष्ट्रातील सर्वात्कृष्ट सक्रिय ५ जिल्हे असल्याचा मान जालना, बुलढाणा, मुंबई (नॉर्थ), पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांनी पटकावला आहे. महाराष्ट्रातील हजारों शाळांपैकी सर्वोत्तम ४० शाळांमध्ये जालना जिल्यातील 6 शाळांची निवड झाली आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना Project Lets Change स्वच्छता मॉनिटर सन्मानित करून राज्यात कुठेही कार्यरत राहण्याच्या दृष्टीने ID issue करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्षा मीना, जिल्हा शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ , जिल्हा समन्वयक श्रीकृष्ण निहाळ, गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे, शाळेचे मुख्याध्यापक इंद्रजीत जाधव, प्रकल्प समन्वयक अनिता पवार व संतोष गंडाळ यांनी काम पाहिले.सहकारी शिक्षक पवन जोशी, प्रभाकर सावंत, बाबासाहेब पवार, वंदना सोनवणे, विष्णू पवार, सुधीर वाघमारे निवडक सन्मानित करण्यासाठी मुंबई मंत्रालय मध्ये शालेय शिक्षण विभाग लौकरच कार्यक्रम आयोजित करत आहे.