जालना शहरातील अंबड रोडवरील गणेश नगर येथे आज दि. 15 जानेवारी रोजी धम्मसाधना बुध्द विहारात भिख्खु संघाच्या हस्ते बुध्द मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. मूर्तीच्या प्रतिष्ठापने पुर्वी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.सदरील मुर्तीची प्रतिष्ठापणा ही औरंगाबाद येथील पू. भिख्खु करुणानंद थेरो, पू. भिख्खु ग्यानरक्षीत थेरो, नालंदा बुध्द विहार येथील पू. भिख्खु शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र, पू. भिख्खु सारीपुत्त थेरो, पू. भिख्खु धम्म बोधी थेरो, पू. भिख्खु धम्मधर, पू. भिख्खु धम्मानंद थेरो, पू. भिख्खु प्राज्ञाकिर्ती, पू. भिख्खु रेवत, पू. भिख्खु राजरत्न, पू. भिख्खु बोधीशील, पू. भिख्खु कल्याण धम्मों यांच्या हस्ते करण्यात आली.
तत्पुर्वी मुर्तीची अंबड रोडवरील नगरातून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर धम्म ध्वजारोन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बुध्दविहाराचे लोकार्पण आणि मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी उपस्थितांना पू. भिख्खु संघाने धम्मदेसना दिली. या कार्यक्रमास जालना विधानसभा मतदार संघाचे आ. कैलास गोरंट्याल यांनी देखील भेट दिली.
यावेळी धम्म साधना बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप एम. शिंदे, सचिव प्रमोदकुमार डोंगरदिवे, मलवार, सुनील वाघमारे, अरुण डोगरदिवे, रुस्तुम तुपे, सुनील म्हस्के, जयेश गायकवाड, राजेश गायकवाड, राजेश सदावर्ते, प्रा. प्रकाश कातुरे, यांच्यासह गणेश नगर, योगेश नगर तसेच इतर नगरातील शेकडो बौध्द उपासक आणि उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.