जालना – महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले तसेच विशेष अधिकारी दत्तात्रय वाघ यांच्या नेतृत्वाखाली कला व अविष्कार या स्पर्धेअंतर्गत 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर रिले, थाळीफेक, खो-खो, उडी लांब, रस्सीखेच अशा क्रीडा स्पर्धा मंगळवारी संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पत्रकार अच्युत मोरे व जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातील तीन शासकीय निवासी शाळा, मुलांची शासकीय निवासी शाळा, भोकरदन व बदनापूर मुलींची शासकीय निवासी शाळा तसेच जालना येथील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी विशेष सहभाग नोंदवला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल, जालना या ठिकाणचे क्रीडा अधिकारी तसेच तालुका क्रीडा अधिकारी व विविध खेळाचे पंच व शासकीय शाळेचे मुख्याध्यापक गिरी यांचे विशेष सहकार्य लाभले. अनुसूचित जाती मुला व मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी अतिशय उत्साहाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला.