भारतीय चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका वेब सिरीजमध्ये बँड पथकातील व्यक्तीसोबत वार्तालाप करतांना अत्यंत खालच्या पातळीचे शब्दप्रयोग करुन बँड वादकाचा अपमान केला आहे. या घटनेचा जालना जिल्ह्यातील बँड पथक संघटनेने निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.
महेश मांजरेकर हे एक आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते आहेत. प्रामुख्याने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या महेश मांजरेकर यांनी अनेक चित्रपट आणि वेब सिरीज दिग्दर्शित केलेले आहेत. ते हिंदी व मराठी चित्रपटात लोकप्रिय झालेले आहेत. परंतु, त्यांनी ज्या लोकांच्या जिवावर अस्तित्व निर्माण केले त्याच लोकांचा खालच्या पातळीवर जावून अपमान केल्याने राज्यात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना येथे जिल्हाधिकारी यांना बँउ पथकाच्या संघटनेचे निवेदन दिले असून मांजरेकर यांनी जाहिर माफी मागावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या निवेदनावर युवराज पिंगळे, संतोष पवार, ग्यानु खंदारे, सुभाष जाधव, सुखदेव थोरात, सदासिव सुरडकर, किशोर कांबळे, सुनिल लाखे, प्रदिप कांबळे, सुधाकर लाखे, सुनिल पिंगळे यांची नावे आहेत.