अंबड तालुक्यातील महाकाळा येथील नागरीकांची राष्ट्री राजमार्ग प्राधीकरण विभागाकडून आडवणूक करुन रस्त्यावर जागोगाजी अडथळे निर्माण केले आहेत. सदरील अडथळे दुर करण्याची विनंती गावकर्यांनी केली, परंतु, त्याकडे दुर्लक्ष करुन नागरीकांना त्रास देणे सुरुच ठेवले. त्यामुळे या प्रकरणाची वरीष्ठ प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. परंतु, या विभागाच्या अधिकार्याकडून तक्रारदार यांना धमकावल्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे गावकर्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
महाकाळा हे राष्ट्रीय महामार्ग 52 (जुना 211) या महामार्गावर महत्वाचे गाव असून येथे साखर कारखाना, शाळा, कॉलेज, बँका दवाखाने, कृषी दुकानें मोठ्या प्रमाणात आहेत. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ने रस्ता रुंदीकरणात भ्रष्ट अधिकार्यांनी मनमानी करुन चुकीचा व बिनकामाचा बायपास रस्ता तयार करुन नागरीकांना त्रास दिला असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे. महाकाळा गावातील शेकडो नागरिक, महिला, विद्यार्थी, आजारी लोकं यांना रस्ता ओलंडण्यासाठी जागोजागी अडचणी निर्माण करुन ठेवल्या होत्या. त्यामुळे रस्त्याचे काम चालू असतानाच हजारो नागरिकांनी रस्ता रोको करुन ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. परतु, प्रकल्प संचालक यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन मनमानी चालूच ठेवले येथीली. ग्रामपंचायतीने ठराव घेऊन अनेक तक्रारी व आंदोलन केले. तसेच चुकीचा व दमदाटी करुन अहवाल देऊन तक्रारी निकाली काढल्या. तक्रारदाराला धमाकावलं, एवढच नाही तर, औरंगाबाद कार्यालयात आंदोलनाचे कागद व ग्रामपंचायत चे ठराव घेऊन गेलेल्या सुदाम अंबादास लहाणे या नागरिकांस अद्यात वाहणाने उडवले. त्यामुळे येथील नागरिक दहशतीच्या वातावरणात आहे. महाकाळा येथील काही राजकीय लोकांचे महामार्ग लगत घरे असल्यामुळे ते गावात आंदोलन कर्त्यावर दहशत निर्माण करीत आहेत. त्यामुळे काही शेतकरी दबावामुळं इच्छा असूनही आंदोलनात सहभागी होऊ शकत नाहीत. येथील काही नागरिकांनी ऑनलाईन तक्रारी करुन या बाबी प्रशासनाच्या वारंवार लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रकल्प संचालक औरंगाबाद हे चुकीचं काम करणार्याला पाठीशी घालण्यासाठी तक्रारी परस्पर निकाली काढून महाकाळा गावचा प्रश्न रेंगाळत ठेवत आहे. असे नागरीकांचे म्हणने आहे. महाकाळा येथील शाळेत, दवाखान्यात, बँकेत, कृषी, दुकानात जाण्यासाठभ दररोज रस्ता ओलांडून पायी जाणार्या हजारो नागरिकांचा प्रश्न सुटवा. प्रमुख जिल्हा मार्ग चौफुली जी महाकाळा गावच्या मुख्य बस थांबा येथे आहे. ती बंद केली.
तिथ अंडर बायपास निर्माण करावा, येथे सर्व बस थांबाव्यात, बस थांबा निवारा निर्माण करावा, येथील दारू दुकान इतरत्र हलवावे, आणि या पुलाला महाकाली देवी उड्डाणं पूल असं नाव देण्यात यावं. या प्रमुख मागण्यासाठी महाकाळा येथील महिला पुरुष दीर्घकाळ न्याय मिळेपर्यंत महाकाळा राष्ट्रीय महामार्ग लगत नियोजित जागेजवळ साखळी पद्धतीने उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. यासाठी अनेक कुटुंब प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार आहेत. औरंगाबाद येथील प्रकल्प संचालकावर कारवाई करुन महाकाळा गावाला व परिसराला न्याय द्यावा अशी मागणी महाकाळा येथील शेकडो नागरीकांनी केली आहे.
या मागणीसाठी कुटुंब प्रमुख, गावचे पुढारी, लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय नागरिकांचे दीर्घकाळ न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषण आंदोलन करणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे प्रकल्प संचालक कसे बघाणार, त्यांच्या समस्या सोडविणार का याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.