नेहरू युवा केंद्र नांदेड, खेळ युवा मंत्रालय भारत सरकार, तथा किरण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माबाद तालुक्यातील मोजे येवती येथे 12 डिसेंबर रोजी नेहरू युवा केंद्राच्या युवा अधिकारी मा. चंदा रावळ कर यांच्या मार्गदर्शनाखाली या तीन माही कौशल्य प्रशिक्षणनाचे उद्धघाटन झाले.
गावातील विविध बचत गट व प्रतिनिधी महिलांच्या हस्ते एकत्रित या कार्यक्रमाचे उद्घाटन करून प्रा.सारिका बकवाड यांच्या कडून प्रक्षिक्षनाचा मुख्य हेतू कथन करण्यात आला. या योजनेतील प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी, महिला प्रतिनिधी चंद्रभागा इरलोड गावातील इतर बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.