फलटण (सई निंबाळकर) : मराठी पत्रकार परिषद फलटण यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकार दिनानिमित्त अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसंदेशकार, माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक दि. २१ व २२ जानेवारी दरम्यान क्रिकेट स्पर्धाचे मुधोजी क्लब मैदान फलटण येथे आयोजन करण्यात आले आहे.
गेली ९ वर्षे या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून राजकीय नेते, शासकीय अधिकारी / कर्मचारी यामध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, पंचायत समिती, वन विभाग, बांधकाम, वकील, शिक्षक, पत्रकार यांच्या टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या असून दि. २१ रोजी सकाळी ९ वा. विविध मान्यवराच्या हस्ते होणार आहे. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचा आनंद फलटणकारांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.