खोपोली – पुणे-मुंबई हायवेवर खोपोली सहा.पोलीस निरीक्षक राकेश कदम व पोसई मोहिते पेट्रोलींग करीत असताना सरकारी वाहण एम.टी.डी मशीनवर एक अनोळखी इसम पाली फाटा येथील ब्रिजच्या खाली हायवेवर पुणे लेनवर जखमी अवस्थेत पडलेला आहे.
याबाबत कॉल आला. सहा.पोलीस निरीक्षक राकेश कदम सदरील घटनास्थळी गेले असता इसम जखमी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले सदर अनोळखी पादचारी इसमाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून त्यास तात्काळ रुग्णवाहिकेतून खोपोली नगरपरिषद डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात घेऊन जाण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाले असल्याचे सांगितले. सदर अनोळखी पादचारी इसमास अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघातात मयत झाला असल्याने लहान-मोठ्या गांभीर स्वरूपाच्या दुखापती करून त्याचे मरणास कारणीभूत होऊन वाहण चालक पळून गेले.
याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात 304 अ , 279 , 337 , 338 , 184 , 134 इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने करत आहे. तसेच अनोळखी इसम कोणाच्या ओळखीचे किंवा माहिती असल्यास खोपोली पोलीस ठाणे 02192 263333 , तपासी अधिकारी 9637140044 या नंबरवर संपर्क करा.