26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन जवळ येतात सर्व शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेचे आणि खेळांचे आयोजन करण्यात येते.यामुळे मुलांचा शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. शालेय मुलांसाठी अभ्यासाबरोबर खेळ ही महत्त्वाचा आहे म्हणून खेळाचा समावेश शालेय जीवनात केला जातो. खेळामुळे चपळता वाढते.खेळाचे विविध प्रकार आहेत. विविध खेळ विविध पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. आणि सोबतच आपला व्यक्तिमत्त्व विकास घडतो.
मुलांना खेळ खेळायला खूप आवडतात. त्यामुळे हे सारे जग त्यांना सुंदर भासते, त्यातच त्यांच्या शरीराचीही वाढ होत असते. ही वाढ होत असताना त्यांच्या शरीरात प्रचंड उर्जा ठासून निर्माण होण्यासाठी मदत होतं असते. त्या उर्जेचा निचरा होण्यासाठीच मुलांला खेळायला मिळाले पाहिजे, भरपूर खेळायला मिळाले पाहिजे. पण आजकाल तसे होत नाही. कारण आजकाल मुलांना सोसायटीत खेळायला जागा नसते. दोन इमारतींच्या मधल्या भागात खेळले की तळमजल्यावर राहाणा-या लोकांना त्याचा त्रास होऊ लागतो.आसपास मैदाने किंवा बागा नसतात. मग घरात बसून टीव्ही पाहाणे किंवा मोबाईलवर खेळ खेळणे ह्यात त्यांना त्यांचा वेळ घालवावा लागतो. त्यातच भर म्हणून शाळा लांब असल्याने रोज दोन दोन तास शाळेत जाण्यायेण्यातच वाया जातात. शिवाय अभ्यास, शिकवणी ह्या सगळ्या रगाड्यातून वेळ मिळाला तर ती मुले मैदानावर जाणार ना?
अर्थात् हे शहरात राहाणा-या मुलांबाबतीत घडत आहे. इतर ठिकाणी मुलांना खेळायला मिळत असेलच.पण सद्य परिस्थितीत या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या खेळांची ज्या पालकांना जाणीव आहे असे, पालक वर्ग इतरत्रखेळांचे वर्ग लावून ती कसर भरून काढत आहेत.याच बरोबर
मुलांना खेळाची आवड लावली की ती मुले वाईट मार्गाला जाणार नाहीत, असा एक समज आहे.
म्हणून सर्वच मुलांना खेळायला मिळाले पाहिजे.
कारण त्यामुळे चांगला व्यायाम घडतो. सर्व स्नायू लवचिक होतात. हृदयाचे स्नायूही बळकट झाल्यामुळे हृदयविकारा- सारखा आजार होत नाही. खेळामुळे शरीर तंदुरूस्त राहातेच. मग अशा ह्या तंदुरूस्त शरीरातले मनही घट्ट, समतोल आणि आनंदी का बरे राहाणार नाही? त्याशिवाय खेळ खेळण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते त्यामुळेच प्रत्येक शाळेमध्ये अशा स्पर्धेचे आणि खेळाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.सर्वच मुलांना खेळ हा खेळायला मिळाला पाहिजे. हा प्रत्येक मुलाचा तो हक्कच आहे.
रूचिरा बेटकर नांदेड
9970774211