उरण दि 27(संगीता ढेरे ) : जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींना मालमत्ता कर मिळण्यासाठी गेली 14 वर्षे लढा देणारे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य तुकाराम कडू यांचा श्री गणेश जन्मोत्सवा निमित्त अध्यक्ष ग्रामसुधारणा मंडळ सोनारी यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा करण्यात आला. सदर सत्कार ग्रामसुधारणा मंडळ सोनारीचे अध्यक्ष राकेश नरेश कडु, उपाध्यक्ष रविंद्र दामाजी तांडेल, सेक्रेटरी साहील मधुकर कडू, खजिनदार धर्मेंद्र केशव कडू व सर्व पंच मंडळ यांच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सोनारीचे सरपंच पुनम महेश कडू, उपसरपंच रेश्मा नंदकुमार कडू, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लक्ष्मण तांडेल, जितेश नरेश कडू व इतर सदस्य तसेच माजी सरपंच महेश नरेश कडू, रोहिदास पाटील, माजी अध्यक्ष अनंत विठ्ठल कडू, नरेश रामा कडू, सुरेश मोतीराम कडू, दत्तात्रेय रामा कडू, फुंडे हायस्कूल चेअरमन कृष्णा गोविंद कडू, सुभाष बाळाराम कडू, जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष नारायण बुधाजी कडू, कामगार नेत्या श्रृती म्हात्रे, पॅनासीयाचे डॉ सुभाष सिंग, जेष्ठ नागरिक संघाचे व श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अनेक पदाधिकारी व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दिनेश कृष्णा कडू होते तर सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.जिल्हा परिषद सदस्य असताना तुकाराम कडू यांनी जनतेसाठी अनेक विकासकामे केली आहेत. जनतेचे विविध समस्या सोडविले आहेत. जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींना मालमत्ता कर मिळविण्यासाठी तुकाराम कडू यांचे विशेष योगदान आहे. ग्रामपंचायतीना मालमत्ता कर मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यामुळे तुकाराम कडू यांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष राकेश कडू यांनी दिली.