जालना : जिल्हा परिषद जालना अंतर्गत वित्त विभागा मध्ये सन २०२२-२०२३ या वर्षात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल गजानन काळे वरिष्ठ सहायक (लेखा) यांची गुणवंत कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली असून दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचे हस्ते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पंजाब पुंडगे यांचे प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रशस्तीपत्र , स्मृतिचिन्ह देऊन गुणवंत कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास अंतर्गत ज़िल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टम व सीएमपी पोर्टल चे काम अचूकपणमे पूर्ण केल्याबद्दल, लेखाविषयक सर्व नोंदवह्या वेळीच अदयावत ठेवून ऑनलाइन केल्याबद्दल तसेच संपूर्ण कामकाज संगणीकृत करून वेळेत पूर्ण केल्या बद्दल गजानन काळे यांचा गुणवंत कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला आहे.
जालना जिल्हा परिषदेने ऑक्टो २०१९ पासून सुरु केलेल्या “SBI CMP” निधी वितरण प्रणालीचे तसेच जून २०२१ पासून सुरु केलेल्या “ZPFMS” निधी वितरण व देखरेख प्रणाली ची राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांनी जालना जिल्हा परिषदेला भेट देऊन माहिती जाणून घेतली व त्यांच्या जिल्हा परिषदेत सुद्धा याची अंमलबजावणी केली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.