ओझरताना सायंकाळी सूर्यास त्या पाहिले
क्षितिजावर विसावताना तुलाच मी आठवले
चालताना वाटेवरती जलदांनाही सवे घेतले
उदयालाही येणार्या चंद्रासही प्रश्न पुसले
घरट्याकडे परतताना पक्षी अलगद दिसुन गेले
चित्रातल्या रंगांसोबत आकाशही हसू लागले
निसर्गाला पाहता असे तुझेच हासू स्मरू लागले
निजतानाही धरणीवरती कुशीत तुझ्या शिरू पाहिले
दाट धुक्याच्या गर्द वावरी अस्पष्टसे काही भासले
थकलेल्या शरीराला मग तुझ्याच गं मिठीत पाहिले
स्वानंद नंदकुमार मराठे