पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना सध्या समोर येत आहे. विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासून चपलांचा हार घालत धिंड काढल्याची घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवरे गावातील ही हादरवून सोडणारी घटना घडली आहे. ही महिला तिच्या पतीच्या दशक्रिया विधीसाठी गेली असता हा धक्कादायक प्रकार घडला आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या पतीच्या दशक्रियेसाठी गेली असता सासरच्या महिलांनी मारहाण करत विधवा महिलेची धिंड काढली. चांदवड तालुक्यातील शिवरे गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. यावेळी विधवा महिलेचं तोंड काळं करून चपलांचा हार घालत गावात धिंड काढण्यात आली.
दरम्यान, या पिडीत महिलेच्या पतीने आत्महत्या केली होती. मात्र पतीने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय पीडित महिलेने व्यक्त केला होता. यामुळेच तिच्या तोंडाला काळे फासून तिला मारहाण आली. या प्रकरणाने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.