देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री असतांना आम्ही जलयुक्त शिवार योजना सुरु केली होती, परंतु, दुर्दैवाने मध्यांतरीच्या काळात ती बंद करण्यात आली. परंतु, आम्ही सत्तेवर आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना आम्ही पुन्हा सुरु केलीय. त्यामुळे गावंच्या गावं पाणीदार होत आहेत. आता तर आमच्या सोबतीला जलतारा आहे. आम्ही या जलतारा प्रकल्पाला प्रमोट करु, कारण जलतारा हा प्रकल्प फार छान आहे. असे गौरोद्गार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी काढले.
यावेळी त्यांनी गुवहाटीचा अनुभव सांगायला सुरुवात करताच उपस्थितामध्ये हश्या पिकला. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो. तेव्हा गुरुदेवांनी मला फोनवर आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना एक लढाई आम्ही सुरू केली असल्याचे सांगीतली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, चांगले काम आहे. चांगले काम करत राहा. सफल व्हा. गुरुदेव चांगले काम करणार्यांच्या पाठिशी उभे राहतात. त्यावेळी तो कार्यक्रम झाल्यामुळे आता हे कार्यक्रम सुरू आहेत. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, श्री. श्री. रवीशंकर यांचे अध्यात्म, व्यसनमुक्ती, तणावमुक्ती, नैसर्गिक शेती, जलसंधारणातही फार मोठे काम आहे. आपल्याला जलतारा, जलसंधारण, जलयुक्त शिवार या योजनांना पुढे न्यायचे असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी यावेळी म्हटले.