शिंदे सरकारमधील नेते कधी काय म्हणतील याचा नेम नाही, शिवाय त्यांनी आघाडीच्या ठाकरे सरकारला अडचणीत आणून सत्ता स्थापन केली, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी राज्यातील सर्वच यंत्राणा एकहाती केली. नगर पालीकेच्या निवडणूका थांबविल्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका थांबविल्या आहेत. विशेष म्हणजे सरकार स्थापक केल्यानंतर त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार देखील थांबविला आहे. त्यामुळे हम करे सो कायदाच त्यांनी आमलात आणलाय. आता तर त्यांनी चक्क देवांनाच अडचणीत आणलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवहाटीचा अनुभव सांगतांना श्री श्री रविशंकर हे सतत संपर्कात होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे करीत आहेत ते योग्य असल्याचा गौप्यस्फोट केला होता. परंतु, श्री श्री रविशंकर यांनी ना. शिंदे यांना उपदेश करीत सावधगीरीचा सल्ला देखील दिला. जो धर्माला सोडून सत्तेत जातो तो जास्त काळ टीकत नाही असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटले.
त्यानंतर शिंदे सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी जालना जिल्ह्यात येऊन देवी देवतांनाच संकटात टाकलंय. भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव येथे दर्शन घेत त्यांनी जाळीच्या देवालाच धर्म संकटात टाकलंय. जाळीचा देव हा मराठवाड्यात असल्याने देवालाच दुर्देवी म्हटलंय. जर हा देव विदर्भात असता तर त्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये देऊ असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे जनतेला आश्वासनं देणार्या सरकारमधील नेत्यांनी चक्क आता देवाला देखील आश्वासनं आणि आमिष दाखवायला सुरुवात केलीय असेच दिसून येतंय.
भोकरदन तालुक्यातील जाळीचा देवे येथे नुकतीच यात्रा महोत्सव सुरु झाला. या यात्रेत लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्याच प्रमाणे शिंदे सरकार मधील आमदार संजय गायकवाड यांनी जाळीचा देव येथे येऊन दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर जाळीच्या देवाचा विकास का झाला नाही याचा खुलासा करुन त्यांनी मराठवाड्याबद्दल असलेला द्वेश जाहीर केला. जाळीचा देव हा मराठवाड्यात असल्याने त्याचे दुर्दैव आहे. तो जर विदर्भात आसता तर त्याच्या विकासासाठी हजारो करोड रुपये देऊ असे आ. संजय शिरसाट यांनी म्हटलं. आता संजय शिरसाट यांचे आश्वासन हे जनतेसाठी होते की, देवाला दाखविलेले आमिष हा नंतरचा भाग आहे.
परंतु, त्यांनी मराठवाड्याबद्दल असलेला तिरस्कार देखील दाखवून दिलाय, हे मात्र नक्की, विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भा बद्दल दुजाभाव देखील त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून केलाय. त्यामुळे शिंदे सरकार त्यांना आवर घालणार की, भविष्यात पुन्हा प्रांतवाद निर्माण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे त्यांनी आ. संतोष दानवे यांच्या मतदार संघात सुरु असलेली गुंडागर्दी आमच्या इकडे होणार नाही. जाळीचा देव येथे गावगुंड आहेत. आणि जाळीचा देव जर विदर्भात आला तर ही गुंडागर्दी होणार नाही, महिलाच्या अंगावर कुणी हात घालणार नाहीत, असे बोलून आ. संतोष दानवे यांचा मतदार संघ गुन्हेगारी असल्याचे त्यांच्या बोलन्यातून दाखवून दिले.
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978