मराठवाड्यातील शेतकर्यांचा तान कमी होतांना दिसत नाही. त्यांच्यावरील कर्जाचा बोजा अजुनही कमी झालेला नाही. आज ठीक होईल उद्या ठीक होईल या अपेक्षेने जिवनं कंठणारे अखेर आपली जिवनयात्रा संपवत आहेत. जालना तालुकयातिल नेर सेवली जवळ असलेल्या हिवरडी गावातील 30 वर्षीय शेतकर्यांनी विषारी औषध पिउन आत्महत्या केल्याची धक्का दायक घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडलीय.
उमेश सर्जेराव भुतेकर वय वर्ष 30 अस या आत्महत्या करणार्या तरुण शेतकर्यांचे नाव असून आज सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी विषारी औषध घेतल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि गावकर्यांनी तात्काळ अंबुलन्स ला कॉल करून त्याला रुग्णवाहिके मध्ये घेऊन जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदे शवविच्छेदना साठी पाठवला आहे. दरम्यान उमेश हा गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत असल्याने सतत तो त्या चिंतेत राहत होता.
त्यातच त्याला दारू पिण्याची सवय लागल्याने त्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडल्याने याच विवेचणेतून त्यांनी विषारी औषध घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे रात्री उशीर झाल्याने मृतदेचा शवविच्छेदना सकाळी करण्यात येणार शवविच्छेदना झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकाला देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय अजगर यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978