जालना शहरातील औद्योगिक वसाहत थ्री फेस च्या झिरो पॉईंट जवळ दोन खाजगी लक्झरी बसेस आपसात भिडल्याने मोठा अपघात झाला परंतु या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शनिवारी पहाटेच्या सुमारास सदरील अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. समृद्धी महामार्गाकडून येणारी बस जालनातील थ्री फेस औद्योगिक वसाहत मार्गे औरंगाबाद कडे जाण्यासाठी वळत असताना औरंगाबादहून जालन्याकडे येणारी लक्झरी बस धडकली. यामध्ये दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दोन्ही वाहनातील आठ प्रवाशी जखमी झाले आहे प्रवाशांना चंदनझीरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र तागवाले आणि हिवाळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मदत कार्य करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.