खोपोली (कु. अदिती पवार) – रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटना आयोजित सामुदायिक व्रतबंध (मुंज) सोहळ्यात समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. या भव्य सोहळ्यात रायगड, ठाणे, पुणे ह्या जिल्ह्या मधील ९२ बटुक मुलांचा सहभाग होता राजकीय व्यक्ती सोबतच प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थितीत राहून बटुना शुभेच्छा दिल्या. अतिशय सुंदर नियोजनबद्ध असा हा सामुदायीक उपनयन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याची तयारी करण्यात येत होती.
अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने प्रथमच रायगड जिल्ह्यामधे सामुदायीक उपनयन (मुंज) सोहळ्याचे आयोजन कर्जत येथील राधामाई मंगल कार्यालय तमनाथ -शिरसे येथे शुक्रवार दि. १० फेब्रूवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुर्वातीस गुरव समाजाचे आराध्य दैवत शिव शंकर, समाजाचे थोर संत काशिबा महाराज,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड.आण्णासाहेब शिंदे, समाजाचे जेष्ठ नेते दत्ताजीराव मसुरकर साहेब यांच्या शुभाशिर्वादाने या सोहळ्यास सुरवात करण्यात आली. यावेळी कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब, माजी विधानसभा संघटक संतोषशेठ भोईर,तुपगांव सरपंच रविंद्रशेठ कुंभार,उद्योगपती संदीपशेठ हांडे, वरई सरपंच ह.भ.प.सुरेश महाराज फराट,महिला प्रदेश अध्यक्ष सौ.सुरेखाताई तोरडमल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अनिल तोरडमल,खालापूर नगरसेविका श्वेताताई गुरव, तमनाथ सरपंच आरतीताई भोईर,करचुंंडे सरपंच श्रद्धाताई कानाडे, वधुवर समिती प्रदेश अध्यक्ष भाग्यश्रिताई भालेराव,पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के, प्रदेश उपकार्याध्यक्ष सुरेशजी गुरव, प्रदेश संपर्क प्रमुख रमेशजी गुरव रायगड-ठाणे-मुबंई संस्था अध्यक्ष बंडूजी खंडागळे,सामाजिक कार्यकर्ते पप्पू गुरव, कोकण विभाग अध्यक्ष सुनिल गुरव,खालापूर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष गुरव,प्रसिद्व तुतारी वादक हरिदास गुरव,पौरोहित योगेश शास्त्री पोरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. चौल कर्म, गणेश पुनुवाचन, मातृका पुजन, देव प्रतिष्ठा, पुण्य गायत्री मंत्र उपदेश, पुर्णाहुती बटुची भव्य वाजत गाजत नृत्यकरत मिरवणूक काढण्यात आली मंत्रघोषाने व्रतबंध (मुंज) सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन रायगड जिल्हा अध्यक्ष अमोल गुरव,प्रदेश युवक अध्यक्ष विजय ठोसर, प्रदेश महिला मुख्य सरचिटणीस अदिती पवार,प्रदेश पत्रकार आघाडी प्रमुख बाळू गुरव,जिल्हा उपाध्यक्ष भुषन प्रधान, कोकण विभाग सरचिटणीस प्रशांत गुरव,जिल्हा महिला अध्यक्ष पूनमताई शिर्के,जिल्हा युवक अध्यक्ष विशाल गुरव,युवक उपाध्यक्ष सचिन गुरव,कर्जत तालुका अध्यक्ष समिर गुरव, महिला अध्यक्ष रत्नप्रभाताई गुरव, गुरव,उपाध्यक्ष चेतन गुरव, उपाध्यक्ष संतोष (भाऊ) गुरव, चिटणीस स्वप्निल* *गुरव,उपकार्याध्यक्ष जगदीश गुरव, महिला कार्याध्यक्ष छाया गुरव,सहचिटणीस विलास गायकवाड सूत्रसंचालन व आभार जिल्हा कार्याध्यक्ष विनायक ढवळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
भारतीय सनातन संस्कृतीमध्ये, मानवी जीवनात सोळा संस्कार सांगितले आहेत. या सोळा संस्कारांपैकी सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे, उपनयन संस्कार. बाल्यावस्थेतील बटूने, उपनयन संस्कार झाल्यानंतर, यज्ञोपवीत धारण करून, बारा वर्षे ब्रह्मचर्यपालन करायचे असते. त्याचबरोबर गुरूगृही जाऊन ज्ञानार्जन करावयाचे असते. या दरम्यान त्याच्या ज्ञानसाधने मध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी त्या बटूने स्वकीयांपासूनही दूर रहावे, असा दंडक आहे. त्यामुळे ज्ञानोपासनेला महत्त्व देणारा उपनयन संस्कार, हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ संस्कार मानला जातो. या संस्काराला व्रतबंध, मुंज,मौंजीबंधन, यज्ञोपवीत संस्कार, असेही म्हणतात. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात या संस्काराचे मूल्य समाजातून कमी होत असल्याचे जाणवते. रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने ९२ बटुंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित करून या संस्काराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या सोहळ्यात ज्या बटुंचा उपनयन संस्कार संपन्न झाला, त्या प्रत्येक बटूला पळी, पात्र, ताम्हण, तांब्या, सोवळे, उपरणे, तसेच संपूर्ण विधी सामुग्री, समाजाचे थोर संत काशिबा महाराज फोटो फ्रेम संघटनेच्या वतीने बटुनां देण्यात आली होती. सोहळ्याला उपस्थित सर्वांना सुरुची जेवण देण्यात आले. ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात वैदिक पद्धतीने सर्व बटूंना उपनयन संस्कार देण्यात आले.बटूंना गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात आली तसेच महिला वर्गाने बटुंना भिक्षावळ घालून आशीर्वाद घेतले.