जालना – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. जालना जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने राज्यपालांची उचलबांगडी करण्यात आल्याने काँग्रेसचे सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला.
शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. महापुरुष यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची हकालपट्टी करण्यात आली, यासंदर्भात आज रोजी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल रफिक यांच्या प्रमुख नेतृत्वात फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला, यावेळी काँग्रेसच्या सेवा दलाच्या शहराध्यक्ष संगीता ताई कांबळे, मुन्ना शेख, किशोर शिरसागर, प्रकाश गायकवाड, सलमान शेख, निसार खान, इसा काशफी, काजी सुजाहत, मोहम्मद दानिश, इमरान शेख, आदीसह काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.