जालना शहरातील बायपास रोडवर मोतीबागेजवळील चौपाटी च्या बाजूला शनिवारी (दि. 11) सायंकाळी 7.30 च्या सुमारास बोलोरोने मोटार सायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला असून तीन जन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय.
शहरातील चौपाटी येथे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बोलेरो जीप क्रमांक एम एच 45 एन 1383 ने दुचाकी क्रमांक एम एच 21 बी के 7109 ला धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. ऋषिंदर रामदास शिरसाट (वय वर्ष 34) असे मृताचे नाव असून मुलगी अर्चना शिरसाट व महिला राधा शिरसाट, बोलेरो जीप मधला विकास तिवारी अशी जखमींचे नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमींची प्रकृती गंभीर असल्याने जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.