उरण (संगीता पवार ) – उरण येथील कुटुंबिनी उरण महिला संघ वतीने नुकताच नगरपरिषद शाळा क्र .३ मैदान ,पेन्शनर पार्क उरण येथे हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या टीव्ही कलाकार संजीवनी पाटील व ममता भाऊ कदम उपस्थित होत्या .कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या सुमन तोगरे ,संगीता ढेरे ,गौरी देशपांडे ,पत्रकार रुचिता मलबारी आदींना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
कुटुंबिनी उरण महिला संघ च्या अध्यक्षा श्र्लोक पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले .
या कार्यक्रमात हळदीकुंकू समूह नृत्य ,एकल नृत्य ,गायन अभिनय सदर करण्यात आले . या वेळी कुटुंबिनी उरण महिला संघ च्या अध्यक्षा श्र्लोक पाटील,उरण नगरपरिषद माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे , सामाजिक कार्यकर्त्या शैलजा सुधीर घरत , माजी नगरसेविका दमयंती म्हात्रे , कुटुंबिनी उरण महिला संघ च्या उपाध्यक्षा दर्शाना गावंड ,माजी अध्यक्षा आरती ढोले ,सचिव दीपिका माळी ,,सहसचिव नयना धोत्रे ,वृषाली पवार ,खजिनदार वर्षा पेवेकर ,सह खजिनदार शुभांगी शिंदे ,प्रियांका घरत ,जनसंपर्क प्रिया मयेकर ,गीता पाटील ,सल्लगार निशा म्हात्रे ,सदस्या पूनम पाटेकर ,हर्षा वारीक ,पूर्वी कोशे ,संगीता साळुंखे ,लीना महाले ,डॉ .सविता डेरे ,गायत्री माळी ,आवंती साळवी ,रिद्धी पाटील ,पत्रकार संगीता पवार आदि मान्यवर उपस्थित होते .