कॉपीच्या भरवशावर शाळा महाविद्यालयात प्रवेश घेऊन केवळ परिक्षेलाच शाळेत जायचे असा गैरसमज ठेवून ज्यांनी 10 वी 12 वी साठी प्रवेश घेतला असेल त्यांनी खुप मोठी चुक केली आहे. कारण या वर्षी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात केवळ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाच पुढच्या वर्गात बसता येणार आहे. यावर्षी भयमुक्त आणि कॉपीमुक्त परिक्षा होत असल्याने केवळ अभ्यासु मुलांनाच गुणवत्ता यादीत झळकण्याची संधी मिळणार आहे.
या वर्षीच्या परिक्षा काॅपी मुक्त होणार… जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष लक्ष… गुप्तता पाळून.. भरारी पथकालाही आयत्यावेळेस कुठे जायचे ते सांगणार…. pic.twitter.com/cCOFzIbYNj
— Hirkani News (@hirkaninews) February 14, 2023
राज्यात 10 वी च्या परिक्षा या दि. 02 मार्च 2023 ते दि. 25 मार्च 2023 पर्यत आणि 12 वी च्या परिक्षा दि. 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 दरम्यान होत आहेत. जालना जिल्ह्यात या वर्षी होणार्या 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात येणार आहेत. कोणालाही कॉपी करण्याची संधी दिली जाणार नसून कॉपी करणारा आणि कॉपी करण्यासाठी मदत करणार्या शैक्षणिक संस्था आणि पालकांवर देखील गुन्ह दाखल होणार आहेत. या संदर्भात आज दि. 14 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात भरारी पथके आणि वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अधिकार्यांनी अत्यंत कडक भुमीका घेतली असून कोणालाही संधी मिळणार नसल्याने त्यांनी म्हटले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, कैलास दातखिळ यांच्यास जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.
राज्याच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्रभर कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात आगामी दहावी व बारावीच्या परिक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी विशेष भरारी पथकाने स्थापन करण्यात आले असून कुठेही कॉपी होणार नाही, याबाबत भरारी पथके दक्षता घेणार आहेत. कोविड नंतर पहिल्यांदाच कॉपीमुक्त परिक्षा होत आहे. जालना जिल्हा आदर्श कॉपीमुक्त पॅटर्न निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरु केले असून जिल्हयात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी या वर्षी चक्क अधिकार्यांनी वज्रमुठ केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सह काही अधिकार्यांचे एक प्रमुख पथक राहणार आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे विशेष 18 भरारी पथके राहणार आहेत. त्यात तहसलिदार आणि उप विभागाीय अधिकारी यांचा समावेश असणार आहे. परिक्षा केंद्रावर जाणार्या भरारी पथकांना देखील उद्या कुठे जायचे आहे ते कळणार नाही. गुप्तता म्हणून रोज सकाळी पथकाला कुठे जायचे आहे ते कळविले जाणार आहे. त्यामुळे पथकाला मॅनेज करणे देखील शक्य नाही.
संस्थेचा निकाल मिळविण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य खराब करु नका – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
10 वी आणि 12 वी च्या परिक्षा या कॉपीमुक्त आणि भयमुक्त पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. संस्थाचालक स्वतःच्या संस्थेचा निकाल चांगला लावण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु, त्यात विद्यार्थ्याची गुणवत्ता नसते. कॉपी करणारा विद्यार्थी हा कधीच यशस्वी होत नाही. त्यामुळे संस्थाचालकांनी संस्थेचा निकाल चांगला लावण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका, त्यांचे उज्वल भविष्य खराब करु नका, गैर प्रकार करुन विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करु नका अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संस्थाचालकांना दिल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी परिक्षेला जातांना 1 तास आधीच परिक्षा सेंटरवर पोहचावे. त्यामुळे त्यांची पुर्ण तपासणी करुन परिक्षा हॉलमध्ये पाठविले जाईल. परिक्षेच्या काळत कमल 144 लागू करणार असून परिक्षा केंद्राच्या 100 मीटर पर्यंत झेरॉक्स सेंटर बंद असणार आहेत. जे झेरॉक्स सेंटर सुरु ठेवतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना परिक्षा देतांना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नका अशा कडक सुचना देखील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या आहेत.
परिक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही बसवा – पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे
विद्यार्थी परिक्षा देत असतांना त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, नियोजन करणे याची सर्वस्वी जबाबदारी ही संस्थेची आहे. परिक्षा काळात कोणाताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संस्थांनी प्रयत्न करावा. ज्या हॉलमध्ये परिक्षा सुरु आहेत तीथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास उत्तम राहील. त्यामुळे गैर प्रकारांना आळा घालने सोपे होईल. कॉपी करणारे किंवा कॉपी परविणारे यांच्यावर गुन्हे दाखल करु, आम्ही कडक भुमीका घेणार असून योग्य वेळी योग्य ठिकाणी कडेकोट बंदोबस्त दिला जाईल असे पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी संस्थाचालकांना सांगीतले.
मिडीयाच्या माध्यमातून गैर प्रकार कानावर येणार नाहीत याची दक्षता घ्या – वर्षा मिना
या वर्षी कॉपीमुक्त परिक्षा होणार आहेत. त्यामुळे कुणीही कॉपी करण्याचा किंवा कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करु नये. सर्वच परिक्षा केंद्रावर विशेष भरारी पथकाचे लक्ष असून गैरप्रकार करणार्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या काही चुका आहेत त्या वेळीच निस्तारा. मिडीयाच्य माध्यमातून कोणात्याही सेंटरवरचा गैरप्रकार निदर्शनास येऊ देऊ नका, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी दिलाय.
परिक्षा केंद्र आणि विद्यार्थी संख्या
जालना जिल्ह्यात 10 वीच्या एकूण 397 शाळा असून 100 परिक्षा केंद्र आहेत तर परिक्षा पेपर ठेवण्यासाठी 11 कस्टडी(परिरक्षक केंद्र) सेंटर आहेत. या वर्षी 10 वी चे एकूण 30 हजार 676 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. तर 12 वी चे एकूण 239 कॉलेज असून 80 ठिकाणी परिक्षा केंद्र देण्यात आले आहेत. 12 वी साठी यावर्षी 31 हजार 127 विद्यार्थी परिक्षा देत आहेत.
पुढील अपडेट माहित करण्यासाठी हिरकणी अॅप डाऊनलोड करा… डॉऊनलोड करण्यासाठी याच लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978
या वर्षीच्या परिक्षा काॅपी मुक्त होणार… जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष लक्ष… गुप्तता पाळून.. भरारी पथकालाही आयत्यावेळेस कुठे जायचे ते सांगणार…. pic.twitter.com/cCOFzIbYNj
— Hirkani News (@hirkaninews) February 14, 2023