दिनाक 13 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी अंगावर चाकूचे वार असलेला 25 ते 30 वर्षे वयाचा मृतदेह आढळून आला होता अनोळखी मृतदेह असल्याने ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते त्याची ओळख पटते ना पटते तेच पुन्हा संध्याकाळी सात वाजता पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कार क्रमाक एम एच 20 ई . जी 0909 मध्ये आढळून आला आहे. या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव संतोष भिकाजी पालोदकर रा .पुंडलिक नगर औरंगाबाद असे आहे.
जालना औरंगाबाद हायवे रोडवर बदनापुर जवळील हॉटेल महाराजा जवळ गाडीत 50 वर्षिय व्यक्ती मृत अवस्थेत आढल्याची पोलीसाना माहिती मिळताच डी वाय एस पी निरज राजगुरु, पो नि माने , एपीआय रामोड,एपीआय पवार, पॉ कॉ . मान्टे, कांबळे, ठाकुर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह ग्रामिण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.
रात्री उशीर झाला असल्यामुळे शवविच्छेदन दिनांक 14 मंगळवार रोजी सकाळी होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले असून मृतदेहाच्या अंगावर कुठलेही प्रकारचे वार किंवा जखमा नसल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सदरील व्यक्ती औरंगाबादहून नांदेड कडे भाडा घेऊन गेलेला होता. नांदेडहून परत आल्यावर गाडी बाजूला लावून पाठीमागील सीटवर मृत अवस्थेत आढळून आला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगा एक दोन मुली असा परिवार आहे. नातेवाईकांनी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल लागत नसल्याचे सांगण्यात आले. खिशामध्ये पाकीट सापडले असून त्यामध्ये तीन हजार रुपये असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली.
पुढील तपास पोलीस करीत आहे